जसे विचार तसे जीवन/ jase Vichar tase Jivan
एक सुंदर गाव होते. त्या गावातील माणसेही खूप आनंदाने राहायचे. सगळे एकमेकांशी आपुलकीने वागायचे. त्याच गावात शामू नावाचा एक मुलगा राहत होता. पण तो सगळ्यांपेक्षा वेगळाच होता. वेगळा म्हणजे सारखा दुःखी राहायचा, शांत बसायचा, कोणासोबतही बोलत नसायचा, त्याला त्याच्या जीवनाचाही कंटाळा आला होता.
त्याच गावात एक महान गुरु राहत होते . ते सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत होते. गावातील सगळ्या माणसांचे प्रश्न सोडवायचे. एके दिवशी शामूही त्या गुरूंकडे गेला व आपली समस्या गुरूंना सांगितली. यावर गुरुने त्याला सांगितले की हे बघ शामू आपले आयुष्य हे खूप छान आहे. त्यासोबत खूप किमती व अनमोल आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे स्वतःच मन आणि मनातील विचार हे असते. आज तू दुःखी आहेस कारण तू तोच तोच विचार सारखा करत आहेस की मी गरीब आहे, माझ्याजवळ पैसे नाहीत, माझ्यामुळे आई-वडिलांना दररोज शेतात काम करावे लागते, एवढेच नाही तर कपडे घ्यायलाही पैसे नाहीत, जेवायलाही अन्न नाही याच विचारत नुसतं जीवन जगत आहेस. दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुझी ही अशीच दिनचर्या चालू झाली आहे. मग मी काय करू असे शामू गुरूंना म्हणाला. यावर गुरु त्याला म्हटले की तू तुझे विचार बदल , शाळेत जाऊन अभ्यास कर आणि काहीतरी नोकरी करून मी सगळं बदलून टाकेल याचा दृढ निश्चय कर.
आई-वडिलांना कामात मदत कर आणि तू गरीब आहेस हे मनातून काढून टाक हे सर्व ऐकल्यानंतर शामुला आनंद होतो आणि त्या क्षणापासून तो साधूने सांगितल्याप्रमाणे तो जीवन जगू लागला. या गोष्टीमुळे खरोखरच शामू मध्ये खूप बदल झाला होता. तो त्याच विचाराने आयुष्य एवढे आनंदाने जगत होता की, त्याला त्याच्यावरच विश्वास बसत नव्हता. त्याला एक मात्र कळले होते की ,आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य असते.
Post a Comment