एक सुखी कुटुंब/ Ek Sukhi Kutumb
एक राजू नावाचा मुलगा होता. तो दररोजच्या प्रमाणे शाळेत गेला. वर्गावरती वर्गशिक्षक आले व शिकवायला सुरुवात केली. सर्व लक्ष देऊन ऐकत होते. सरांनी मुलांना एक वेगळा धडा शिकवायला चालू केला होता. तो म्हणजे सरांनी मुलांना सांगितले की तुम्ही तुमच्या घरच्यांना किती त्रास देता. तरीही ते तुम्हाला काहीच बोलत नाहीत. जसं की-जेव म्हटलं तरी पटकन जेवायचं नाही, आईजवळ हट्ट धरायचा, मला हे नको, ते नको, हेच पाहिजे जेवायला, तरच मी जेवण करल, नाहीतर नाही करणार. वडिलांसोबत ही तसाच हट्ट धरायचा. चला पप्पा आज बाहेर जाऊ आपण फिरायला आणि नाही गेलं तर बोलायचं नाही. आजी आजोबांचे सुद्धा काम ऐकायचे नाही. भाऊ बहिणी सोबत छोट्याशा गोष्टीमुळे भांडण करत बसायचं.
राजू घरी आला पण नाराजच होता. घरी कोणाशीच बोलला नाही. गुपचूप त्याच्या रूममध्ये जाऊन नाराज होऊन बसला व एका पेपर वरती लिहिले, "सॉरी आई बाबा" तुम्हाला त्रास दिल्याबद्दल. आज पासून मी कोणताही हट्ट करणार नाही. "सॉरी आजी आजोबा" आजपासून तुमचं सगळं काम ऐकत जाईल. आणि लहान भावांना पण त्रास देणार नाही. हे सर्व लिहून राजू झोपी गेला. तो पेपर त्याच्या आईने वाचला व त्यावरती लिहिले, तू काहीही केले तरी तू आमचा लाडका राजू आहेस. आम्हाला तुझ्या वागण्याचा त्रास नाही तर आनंद होतो. तू जसा आहे तसाच रहा. आपल्या कुटुंबाचा सर्वांचा आवडता आहेस. हे वाचून राजू ही खुश झाला आणि सर्व कुटुंब आनंदाने हसू लागले.....
Post a Comment