गावाकडची मज्जा / Gavakadachi majja/ holidays
पिंकी आणि राजू दररोज शाळेत जाऊन आणि अभ्यास करून कंटाळले होते. आई-बाबांशी बोलता बोलता राजू म्हणाला चला बाबा आज आपण बाहेर फिरायला जाऊ. पण बाबांनी नकार दिला. राजू व पिंकी दोघेही नाराज झाले. व त्यांच्या रूममध्ये जाऊन शांत बसले.
आईने दोघांनाही जेवायला बोलावले. जेवता जेवता गावाकडून आजी आजोबांचा फोन आला. बोलून झाल्यानंतर राजूच्या आईने एक विचार केला आणि म्हटली की-पुढच्या आठवड्यात आपण सुट्टी घेऊन गावी फिरायला जाणार आहोत. पिंकी ने व राजू ने एकमेकांकडे पाहिले. पण ते दोघे एवढे काही खुश नव्हते. कारण त्यांना वाटले गावी पाहायला एवढं काही खास असणार नाही. शहरात जशी हॉटेल, गार्डन, स्विमिंग पूल तसं गावाकडे काय असणार? असे त्यांना वाटले.
पण आईचा हट्ट असल्यामुळे सगळे गावी निघाले. गावी पोहोचल्यावर आजी-आजोबांना पाहून दोघेही आनंदी झाले. आजी-आजोबांनी ही दोघांना जवळ घेऊन मिठीत घेतले. दुसऱ्या दिवशी राजूचे लगेचच मित्र झाले आणि पिंकी सुद्धा मैत्रिणी बनवून त्यांच्यासोबत खेळू लागली. गावची ती सुंदर सकाळ, पक्षांचा किलबिलाट, गुराढोरांचे आवाज, स्विमिंग पूल पेक्षाही तळ्यात पोहण्याची मज्जा पाहून दोघांचीही गावाकडे एवढे मन रमून गेले की त्यांना शहरातील सगळ्या गोष्टीच विसरून गेल्या.
रात्री सगळे अंगणात जेवायला बसले. वरील आकाशात चांदण्या पाहून तर पिंकी व राजूचं पोटच भरलं होतं. जेवता-जेवता आई म्हटली की चला आता तयारी करा उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे. हे ऐकून दोघेही रडू लागले व आजी आजोबांना मिठी मारली आणि आईला म्हणाले आपण पुढच्या सुट्टीलाही गावाला यायचं आई कारण गावाकडची मज्जा वेगळीच असते.
Post a Comment